Home > Politics > Shivsena Vs Shivsena : त्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला विकत घेतलं आहे का? संजय राऊत यांचा सवाल

Shivsena Vs Shivsena : त्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला विकत घेतलं आहे का? संजय राऊत यांचा सवाल

14 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापुर्वीच संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

Shivsena Vs Shivsena : त्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला विकत घेतलं आहे का? संजय राऊत यांचा सवाल
X

Shivsena Vs Shivsena : 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस (valentine Day) आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीला सगळं काही प्रेमाने होईल आणि सरकार पडले असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. संजय राऊत यांच्या दाव्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता मंगळवारी होणाऱ्या सुनावणीपुर्वी संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय (Supreme court) आणि निवडणूक आयोगाच्या (Election commission of India) निकालापुर्वी भाजप नेत्यांकडून येणाऱ्या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ज्या प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), याबरोबरच शिंदे गटाचे काही मंत्री निकाल आमच्याच बाजूने येणार असल्याचे वक्तव्य करत आहे. सुनावणी सुरु असतानाच अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या वक्तव्यावरून यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय विकत घेतलं आहे का? असा प्रश्न पडत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी सामनाच्या (Samna Editorial) अग्रलेखातील सोनेरी टोळी कोण? याविषयी तुम्हाला लवकरच कळेल. मी मंत्र्यांच्या बंगल्यावर, मंत्रालयात आणि बाहेरसुध्दा सगळ्यांना समोर आणणार आहे. मात्र पत्रकारांनीही सोनेरी टोळीचा शोध घ्यावा, असं मत व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पहिल्या दहामध्येही नाही. त्यामुळे एक गोष्ट समोर आली आहे की, महाराष्ट्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री मानतच नाही. महाराष्ट्र दिल्लीच्या (Delhi) खिजगणतीतही राहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Updated : 13 Feb 2023 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top