Home > Politics > ''...तरच आपण पुढे एकत्रितपणे निवडणूक लढू शकतो'' संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य...

''...तरच आपण पुढे एकत्रितपणे निवडणूक लढू शकतो'' संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य...

...तरच आपण पुढे एकत्रितपणे निवडणूक लढू शकतो  संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य...
X

सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांनी जी चूक केली आहे ती त्यांची चूक आहे. या चुकीला काँग्रेसची (Congress) चूक म्हणून पाहता येणार नाही. जे काही नाशिकमध्ये (Nashik) घडलं आहे ते घडायला नको होतं. सध्या मविआ (Mahavikas Aghadi) मध्ये समन्वय दिसत नसल्याची खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी, ''मी कुणालाही दोष देत नाही पण सध्या मविआ मध्ये समन्वय दिसत नाही. विरोधी पक्षात काम करतानाही समन्वय असला पाहिजे. नागपूर (Nagpur) आणि नाशिकच्या (Nashik) जागेसाठी चर्चा व्हायला हवी होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भविष्यात महाविकास आघडीच्या नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत. महाविकास आघाडीत निर्णय घेताना समन्वय ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हंटले आहे...


Updated : 14 Jan 2023 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top