Home > Politics > 'त्या' वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांची दीड तास चर्चा

'त्या' वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांची दीड तास चर्चा

त्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांची दीड तास चर्चा
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात "एकत्र आलो तर भावी सहकारी" असा उल्लेख केल्यानंतर राज्यात राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना बंद दाराआड झालेल्या चर्चेची माहिती जाहीर करायची नसते, असे म्हटले आहे. तसंच ही भेट नेमकी कशासाठी होती, हे सांगणे टाळले.

"जे माजी नेते आहेत ते महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी संपर्क ठेवतायेत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी तसे वक्तव्य केले होते असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा येथील गणरायाचे संजय राऊत यांनी दर्शन घेतले. तसेच आपण गणपतीच्या दर्शनासाठी आलो होतो, असेही सांगितले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त केली. गणेश विसर्जनानंतर राजकीय घडामोडी घडतील का या प्रश्नावर त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेली ४८ तासांची मुदत संपली आहे, त्यांना विचारा असा टोला लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत कोणतीही अस्वस्थता नसल्याचा दावा त्यांनी केला.

Updated : 18 Sep 2021 9:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top