Home > Politics > ...तोपर्यंत भारताला चीनसमोर झुकावे लागणार- संजय राऊत

...तोपर्यंत भारताला चीनसमोर झुकावे लागणार- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना जोवर आपण चीनवर अवलंबून आहे तोवर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागेल असं म्हटलं आहे.

...तोपर्यंत भारताला चीनसमोर झुकावे लागणार- संजय राऊत
X

मुंबई : जोवर आपण चीनवर अवलंबून आहोत तोवर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागणार आहे, अफगाणिस्तानातील तालिबानी राजचे समर्थन हे सर्वात आधी चीन ने केले होते, चीन आजवर आपल्यासाठी डोकेदुखी बनून राहिला आहे. आजही आपले आर्थिक व्यवहार हे चीनवर अवलंबून आहेत. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटल आहे. सोबतच चीन सोबतचे सर्व व्यापार आणि आर्थिक व्यवहार संपवायला हवा. भारताने आता खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

सोबतच अफगाणिस्तानबाबत बोलताना अफगाणिस्तानबरोबर सध्या जे सुरू आहे त्याबाबत संपूर्ण जगाला चिंता लागून राहिली आहे. संपूर्ण जगात त्याचा काय परिणाम होईल , अमेरिकेपासून- रशियापर्यंत आणि हिंदुस्थानपासून सगळीकडे हीच चिंता लागली असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. तालिबानी लोक हे लोकशाही मानत नाही. ज्यापद्धतीने त्यांनी अफगाणिस्तान वर कब्जा केला आहे त्यामुळे हिंदुस्थानने देखील सावध राहिलं पाहिजे. अनेक देशातील लोक तेथे अडकून पडले आहेत त्यांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सोबतच पाकिस्तानने नेहमीच तालिबानच समर्थन केले आहे. हिंदुस्थानातील व्यवहार, कायदे सुव्यवस्था या सगळ्याच बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे असं राऊत यांनी म्हंटल आहे.

Updated : 2021-08-16T11:48:36+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top