Home > Politics > 'किरीट सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात'- संजय राऊत

'किरीट सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात'- संजय राऊत

किरीट सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात- संजय राऊत
X

मुंबई : अलिबाग आणि जरंडेश्वर येथे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपाला उत्तर दिलं आहे.'किरीट सोमय्यांनी चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही आहे, देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे, आरोप कोणीही करू शकतं, आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावता येत नाही.' असं राऊत यांनी म्हटले आहे.

सोबतच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सरकारला कारवाई करावी लागते असंही राऊत यांनी म्हटले आहे. म्हणूनच गृहमंत्रालयाने किरीट सोमय्यांवर कारवाई करत त्यांना रोखलं असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एखाद्याला आरोप करायचेच असेल तर आम्ही काय करणार, आरोप कोणावर होत नाहीत, आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होतात असाही पलटवार राऊत यांनी केला.सध्या आरोप करणं ही फॅशन झाली आहे, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपाला गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

Updated : 20 Sep 2021 5:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top