Home > Politics > अस्वलाचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा..?

अस्वलाचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा..?

"जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते,`` संजय राऊत कोणाला म्हणाले?

अस्वलाचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा..?
X

महाराष्ट्राचे राजकारण हे साध्य भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. शिवसेनेतील आमदारांचे बंड त्यानंतर आसाम, गुवाहाटी इतकंच काय शाहजीबापूंच्या त्या काय झाडी काय डोंगार या डायलॉग पासून सगळ्यांचीच चर्चा झाली. कसलीच पुसटशी देखील कल्पना न लागता शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत बंड करत भाजप बरोबर सरकार स्थापन केलं.

यामध्ये काही आमदार तर असे निघाले की जे आदल्या दिवशी बंडखोर आमदारांवर टीका करत होते. त्यांना परत येण्याच्या विनवण्या करत होते मात्र दुसऱ्याच दिवशी ते सुद्धा आपल्या नेत्याला रामराम ठोकत शिंदे गटात गेले. राज्याच्या राजकारणात नक्की काय चाललंय याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना सोडा पक्षातील पक्षश्रेष्ठीना पण लावता आला नाही.

हे सगळं होतं असताना यातील एकही आमदार आत्तापर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंना आमचा नेता मानत नाही असे म्हणायला तयार नाही. किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात, ते आमचं ऐकत नाहीत व आम्हाला वेळ देत नाहीत ही एक तक्रार सोडली तर कुणीही टीकाटिप्पणी सुद्धा केली नाही. या सगळ्या बंडानंतर खरी गोची ही या आमदारांची झाली आहे. या पूर्वी पक्षनिष्ठा किंवा भाजपने शिवसेनेवर केलेला अन्याय अशा गोष्टींवरून आपल्या सभा गाजवणाऱ्या याच आमदारांचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप आता समाजमाध्यमांवर व्हायरल होतं आहेत. इतकंच नाही तर हे आमदार महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला निधी मिळतं नाही असं देखील म्हणत होते. मात्र माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी तर थेट सभागृहात यांना किती निधी मिळाला होता याची लिस्टच वाचली. या सगळ्यामुळे या आमदारांची आता गोची झाली आहे. हे सगळं होतं असताना संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी "जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते.." असं कॅपशन दिलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलेला व्हिडिओ काय आहे? तर यात एक अस्वल जंगलातून जात आतांना आरश्यात पाहते त्यानंतर ते इतके घाबरते की, ते आस्वल तो आरसा फोडून टाकते. आता राऊत यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ या बंडखोर आमदारांसाठीच तर नाही ना?

Updated : 10 July 2022 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top