Home > Politics > धनुष्य नीट उचला- संजय राऊत

धनुष्य नीट उचला- संजय राऊत

रावणाने देखील धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता, हे रामायणातून जरा समजून घ्या, असा टोला ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना सत्ताधाऱ्यांना लगावला. त्यांनी आणखी कोणत्या विषयांना हात घातलाय हे वाचा...

धनुष्य नीट उचला- संजय राऊत
X

गुरुवारी पुण्यातील दोन पोटनिवडणुकीचे निकाल लागले आणि यामध्ये गेल्या ३० वर्षापासून भाजपची सत्ता उलथवून लावली. कसबा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने भाजपचा सपशेल पराभव केला आणि हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. अशी डोंगर सोंग महाराष्ट्रात चालत नाहीत, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी कोल्हापूरात सत्ताधाऱ्यांना लगावला. त्यांच्या यात्रा म्हणजे सगळ्यात पैशांचा खेळ असतो, असे सुद्धा राऊत यांनी सुनावले. हक्कभंग समिती ही पक्षपाती आहे, मूळ शिवसेनेचा (Shiv Sena) एकही सदस्य त्यात घेतलेला नाही, ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनाच न्यायाधीश करण्याचा प्रकार केल्याचे राऊत म्हणाले. कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by election) त्यांचा पराभव झाला आहेच, पण चिंचवडमध्ये त्यांचा विजय झाला हे मी मानायला तयार नसल्याचे राऊत यांनी सांगितले. संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निगवॉक करत असताना अज्ञातांनी हल्ला केला, या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया देताना कोण आहेत ते? कुठे राहतात ते ? असा प्रतिप्रश्न केला. तसेच कोणत्याही नागरिकांवर अशा प्रकारचे हल्ले होणे, हे कायद्याने चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

मी अजून नोटीस वाचली नाही, माझ्या हातात अजून नोटीस पडलेली नाही, माझ्या हातात नोटीस असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो, इतक्या घाईघाईत कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही मला कायद्याचा अभ्यास करावा लागेल. या राज्यात सगळ्याच गोष्टी बेकायदेशीरपणे सुरू असल्यामुळे सरकारच बेकायदेशीरपणे बसलेले आहे, असा टोला सत्ताधाऱ्यांना संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी लगावला. मी विधिमंडळाचा आणि आमदारांचा अपमान होईल, असं काहीही म्हटलेलं नाही, असे राऊत यांनी सांगितले. एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे, असं सांगतो आहे. त्या गटाबद्दल मी बोललेलो आहे. त्यामुळे हक्क भंग होतो की नाही, हे पाहावं लागेल. आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा. असे राऊत म्हणाले. नागालँड मध्ये आठवले गटाला जागा मिळाल्या आहेत, हे जगातले आश्चर्य आहे, असे म्हणावे लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रात जरी त्यांना जागा मिळाल्या नसल्या तरी नागालँडच्या (Nagaland) भूमीवर त्यांना जागा मिळाल्या मी त्याचे अभिनंदन करतो, असे संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी सांगितले.

Updated : 3 March 2023 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top