Home > Politics > चंद्रकांत दादा पाटील सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट गृहस्थः संजय राऊत

चंद्रकांत दादा पाटील सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट गृहस्थः संजय राऊत

चंद्रकांत दादा पाटील सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट गृहस्थः संजय राऊत
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात देशातील मुख्यमंत्र्यांशी काल १३ जानेवारीला संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात टीका करण्यासारखं अजून आहे तरी काय? भारतीय जनता पक्षाने चीन जे आत मध्ये घुसलं आहे त्यावर बोललं पाहिजे. फार गंभीर परिस्थिती आहे सीमेवर … भारत पाकिस्तान वर रोज बोलतात एकदा चीनवर बोललं पाहिजे. देशात महाराष्ट्र हे सर्वात सुरक्षित राज्य आहे.

चंद्रकांत पाटील असो किंवा भाजपचे नेते असतील त्यांच्या चष्म्याचा नंबर मला एकदा चेक करावा लागेल. नेत्र तज्ज्ञ डाॅक्टर लहाने यांना एखादं पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येईल का? हे चेक करण्यासाठी पाठवावे लागेल. भाजपच्या नेत्यांना आम्हाला श्रवण यंत्र ही द्यायची आहेत.

शिवसेना अशा प्रकारची शिबीर घेत असते. चष्मा शिबीर, कानाच्या संदर्भातील शिबीरं, कोणाला गरज असेल तर आम्ही त्यांच्यावर उपचार करू. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे चाललं आहे. महाविकास आघाडीचं राज्य उत्तम प्रकारे चाललं आहे.

चंद्रकांत दादा पाटील सज्जन गृहस्थ आहेत.निरागस आहेत. निष्पाप आहेत. निष्कपट आहेत. त्यांनी पुढच्या निवडणूकींचे तयारी करावी. चंत्रकांत पाटीलांनी इकडे तिकडं तडमडू कडमडू नये. त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जपावं… अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. काय म्हटलं आहे राऊत यांनी…


Updated : 2022-01-14T11:06:04+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top