Home > Politics > नुसते खुर्च्यांवर बसू नका, संजय राऊत यांचा आपल्याच मंत्र्यांना दम

नुसते खुर्च्यांवर बसू नका, संजय राऊत यांचा आपल्याच मंत्र्यांना दम

नुसते खुर्च्यांवर बसू नका, संजय राऊत यांचा आपल्याच मंत्र्यांना दम
X

महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी आता भाजपच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी आता नुसते खुर्च्यांवर बसू नये तर टीकेला उत्तर द्यावे, राज्य सरकारची बदनामी केली जात असताना मंत्र्य़ांनी शांत बसू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन मोद सरकावर जोरदार हल्ला केला. राज्यातील नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. पण त्याचबरोबर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनीही भाजपला उत्तर दिले पाहिजे, केवळ शरद पवार, सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपण स्वत: एवढ्याच लोकांनी उत्तर का द्यायचे, आता सर्व मंत्र्यांनीही या टीकेला आणि खोट्या आरोपांना उत्तर दिले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. कुठे हिमालय आणि कुठे टेंगुळ अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यावर एकेरी भाषेत टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची पात्रता काय, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


Updated : 2021-10-18T13:19:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top