Home > Politics > सांगली जिल्हा बँक निवडणूक: महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल, भाजपला 2 जागांवर यश

सांगली जिल्हा बँक निवडणूक: महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल, भाजपला 2 जागांवर यश

सांगली जिल्हा बँक निवडणूक: महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल, भाजपला 2 जागांवर यश
X

सांगली जिल्हा बॅंक निवडणूक आत्तापर्यंत हाती आलेल्या 8 जागांच्या निकालानुसार आघाडीच्या 6 उमेदवारांचा विजय झाला असून भाजपाच्या केवळ 2 उमेदवारांना यश मिळाले आहे. जत सोसायटी गटातून भाजपचे प्रकाश जमदाडे विजयी झाले असून विक्रम सावंत यांचा त्यांनी 6 मतांनी पराभव झाला आहे. प्रकाश जमदाडे यांना 45 मते मिळाली आहेत.

कवठेमहांकाळ सोसायटी गटातून अजितराव घोरपडे हे विजयी झाले आहेत. त्यांना 54 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार विठ्ठल पाटील यांना केवळ 14 मते मिळाली आहेत. वाळवा सोसायटी गटातून भाजपाच्या भानुदास मोटे यांना पराभव पत्करावा लागला आहे. या गटातून आघाडीचे उमेदवार दीलिपतात्या पाटील हे तब्बल 108 मते मिळवत बहुमताने निवडून आले आहेत. भानुदास मोटे यांना केवळ 23 मतांवर मजल मारता आली.

कडेगांव सोसायटी गटातून आघाडीचे उमेदवार मोहनराव कदम हे विजयी झाले असून त्यांना ५३ मते मिळाली तर भाजपाच्या तुकाराम शिंदे यांना 11 मते मिळाली आहेत. मिरज सोसायटी गटातून आघाडीचे उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. त्यांना ५२ मते मिळाली तर भाजपाच्या उमेश पाटील यांना 16 मते मिळवत हार पत्करावी लागली आहे.

तासगाव सोसायटी गटातून आघाडीचे उमेदवार बी एस पाटील हे विजयी झाले असून या गटातील भाजपाचे उमेदवार सुनील जाधव यांना २३ तर अपक्ष उमेदवार ॲड प्रताप पाटील यांना 15 मते मिळाली आहेत.

आटपाडी सोसायटी गटातून अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांचा 11 मतांनी पराभव झाला असून आघाडीचे उमेदवार तानाजी पाटील यांनी 40 मते मिळवत विजय मिळवला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीमध्ये महाविकासआघाडी व भाजप असा थेट सामना आहे. महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल समोर भाजपच्या शेतकरी पॅनेलने आव्हान निर्माण दिलं होतं. एकूण 21 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्याती 3 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 18 जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीसाठी 43 उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे 18 तर भाजप प्रणित शेतकरी पॅनेलचे 17 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 8 बंडखोर उमेदवारांचा समावेश.

Updated : 23 Nov 2021 5:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top