Home > Politics > ज्यांची कोणाची हिंमत असेल त्यांनी माझ्याकडे या, संदीपान भुमरे यांचे शिवसैनिकांना आव्हान

ज्यांची कोणाची हिंमत असेल त्यांनी माझ्याकडे या, संदीपान भुमरे यांचे शिवसैनिकांना आव्हान

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले. त्यावेळी 40 बंडखोर आमदारांमध्ये पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे सुध्दा होते. त्यामुळे संदीपान भुमरे यांनी औरंगाबादमध्ये फिरून दाखवावे, असे आव्हान शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्याला संदीपान भुमरे यांनी प्रतिआव्हान दिले.

ज्यांची कोणाची हिंमत असेल त्यांनी माझ्याकडे या, संदीपान भुमरे यांचे शिवसैनिकांना आव्हान
X

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यातच पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे देखील आपल्या मतदारसंघात दाखल झाले. दरम्यान संदीपान भुमरे यांनी औरंगाबादमध्ये फिरून दाखवावे, असे आव्हान शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्याला संदीपान भुमरे यांनी प्रतिआव्हान दिले.

संदीपान भुमरे म्हणाले, आम्हाला धमक्या दिल्या जातात की शहरात येऊन दाखवा, फिरून दाखवा. मी धमक्या देणाऱ्यांना सांगतो की, मी उद्या शहरात फिरणार आहे. ज्यांची हिंमत असेल त्यांनी माझ्याकडे यावे.

तसेच पुढे बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत संघटनेसाठी 35 वर्षे काम केले. त्यामुळे स्लीपर बॉयचा मंत्री केला अशी टीका करणाऱ्यांनी आमचं संघटनेसाठी असलेलं योगदान विसरू नये. तसेच यावेळी संदीपान भुमरे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला.

आम्ही बंड नाही तर उठाव केला आहे. त्याबरोबरच आमच्यासोबत असलेले सर्व आमदार पैशावाले होते. त्यामुळे पाच पन्नास कोटीसाठी अशा प्रकारे कोणालाही पैशाचं वाटप केले नसल्याचे संदीपान भुमरे यांनी सांगितले.

शिवसेना नेमकी कुणाची असा प्रश्न करताच संदीपान भुमरे यांनी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असल्याचे म्हटले. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाच्या बाहेर नाही त्यांनी जोही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल. तसेच मला मंत्रीपद मिळो अथवा न मिळो पण मी शिंदे यांच्यासोबतच असणार आहे, असंही संदीपान भुमरे म्हणाले.

Updated : 6 July 2022 9:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top