Home > Politics > नाहीतर रस्त्यावर पवार, पवार ओरडत फिराल, संदीप देशपांडे यांच्या संजय राऊत यांना कोपरखळ्या

नाहीतर रस्त्यावर पवार, पवार ओरडत फिराल, संदीप देशपांडे यांच्या संजय राऊत यांना कोपरखळ्या

मनसे नेते संदीप देशपांडे काळजीपोटी सल्ला देत आहे, असं म्हणत संजय राऊत यांना कोपरखळ्या मारल्या आहेत.

नाहीतर रस्त्यावर पवार, पवार ओरडत फिराल, संदीप देशपांडे यांच्या संजय राऊत यांना कोपरखळ्या
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच शिवसेना विरुध्द ठाकरे गटाचे (shivsena Vs Thackeray group) नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Tweet) यांनी एक पत्र ट्वीट करून संजय राऊत यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या आहेत.

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आदरणीय संजय राऊत, आपुलकीने जय महाराष्ट्र!

येडxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

पुढे पत्रात म्हटले आहे की, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या. मग हळू हळू आठवड्यातून एकदा, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल. याबरोबरच सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling) मनाला लावून घेतली आहे, ती आधी आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब (Uddhav Thackeray) आणि आदित्य साहेब (Aaditya Thackeray) सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार... पवार....असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या... नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा , असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना पत्र लिहीले आहे.

Updated : 22 Feb 2023 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top