News Update
Home > Politics > सनातन संस्थेवर बंदीची मागणी, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

सनातन संस्थेवर बंदीची मागणी, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

सनातन संस्थेवर बंदीची मागणी, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी
X

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीचा मुद्दा शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी उपस्थित केला. तसेच कर्नाटकातून धमकी आल्याने यामागे राजकीय कनेक्शन असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. दाभोलकर,पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांचे कनेक्शनही कर्नाटकात आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचेही कनेक्शन काय याचा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

तसेच सनातन संस्थेवर कारवाईचीही मागणी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू यांना उत्तर दिले. पण छगन भुजबळ यांनी सनातनवर बंदीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ सुप्रीम कोर्टात वकील असते तर बरे झाले असते असा टोला लगावला.
Updated : 2021-12-23T16:58:38+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top