Home > Politics > समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध, मलिक यांचा गंभीर आरोप

समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध, मलिक यांचा गंभीर आरोप

समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध, मलिक यांचा गंभीर आरोप
X

NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची मालिका राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सुरूच ठेवली आहे. बुधवारी नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे, किरण गोसावी, प्रभाकर साईल आणि समीर वानखेडे यांच्या गाडीचे ड्रायव्हर यांच्या फोन कॉलची तपासणी करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर त्या दिवशी जहाजावरील क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर त्याच्या गर्लफ्रेंडसह उपस्थित होता, असाही आरोप मलिक यांनी केला आहे.

क्रुझवर झालेली ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. कोरोनाचे निर्बंध असूनही राज्य सरकारची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असाही आरोपा नवाब मलिक यांनी केला आहे. त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियासुद्धा हजर होता. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी होती, तिच्याकडे पिस्तुल होते, असाही आरोप नवाब मलिक यांनी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय माफिया हा दाढीवाला होचता आणि तो कोण आहे याची माहिती NCB च्या सर्व लोकांना आहे, तो माफिया काही काळ तिहार आणि राजस्थानच्या जेलमध्येही होता, त्याची वानखेडेंसोबतही मैत्री आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यामध्ये गोव्याचे मोठे रॅकेट असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. क्रूझवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्यात यावे अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

Updated : 27 Oct 2021 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top