Home > Politics > मनोहर जोशींचं घर जाळायचा आदेश होता- सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

मनोहर जोशींचं घर जाळायचा आदेश होता- सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

मनोहर जोशींचं घर जाळायचा आदेश होता- सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट
X

एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी मनोहर जोशींचे घर जाळण्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी दादरचे आमदार सदा सरवणकर यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सदा सरवणकर म्हणाले की, 1976 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मला उपशाखाप्रमुख केलं. त्यानंतर 1979 मध्ये शाखाप्रमुख आणि 1992 मध्ये नगरसेवक झालो. त्यानंतर मी आमदार झालो. मात्र त्यावेळी तिथे आदेश बांदेकर आले होते. मी पाच वर्षे आमदार होतो. माझी कुठलीही चूक नव्हती. मात्र आदेश बांदेकर यांनी तयारी सुरू केली. त्यावेळी मनोहर जोशी यांनी उमेदवारी मलाच असल्याचे सांगितले होते. मात्र आदेश बांदेकर यांना उमेदवारी देत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी माझ्यासह काही शिवसैनिक पक्षप्रमुखांना भेटायला गेलो आणि त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावेळी माझी कुठलीही चूक नसल्याचे मी सांगितले. त्यावेळी घड़लेली घटना दुर्दैवी होती. ती इतरांच्या आयुष्यात घडू नये, असंही सदा सरवणकर म्हणाले.

सदा सरवणकर यांनी सांगितले की, मला मिलिंद नार्वेकर म्हणाले, तुझी उमेदवारी मनोहर जोशी यांनी कापली आहे. तुला काय करायचं असेल तर तिकडे जाऊन कर. मी मातोश्रीतून बाहेर आलो. त्यावेळी माझ्यासोबत शिवसैनिकांचा जमाव होता. तेव्हा आम्ही बांद्रा पुलावर आल्यानंतर संजय राऊत यांचा फोन आला आणि संजय राऊत म्हणाले, अरे सदा तू कुठे चालला? तेव्हा मला काही कळाले नाही. कारण मी त्यांना काही बोललो नव्हतो. उध्दव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर आम्ही मनोहर जोशींच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारणार होतो. मात्र त्यावेळी संजय राऊत यांचा फोन केला. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, तुझी उमेदवारी मनोहर जोशी यांनीच अर्वाच्च शिवी देऊन कापली आहे.

तू त्यांना सोडू नको. त्यांचं घर जाळून टाक. त्यावेळी मी संभ्रमात पडलो की मी मातोश्री सोडून पाच मिनिटं झाले नाहीत तोच संजय राऊत यांना ही खबर कशी मिळाली. मात्र त्यानंतर आम्ही शेवटी मनोहर जोशी यांच्या घरावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मी पोहचण्याच्या आधी तिकडे शिवसैनिक पोहचले होते. त्यांनी सांगितलं की, मनोहर जोशी यांच्या घराबाहेर ३० ते ४० कॅमेरे लावले आहेत. याचा अर्थ मला मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावायचे आणि त्याचे लाईव्ह ब्रॉडकास्ट करायचे असा कट रचल्याचे लक्षात आल्याचा गौप्यस्फोट सदा सरवणकर यांनी केला.

संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचे घर जाळण्याचे आदेश दिले आणि दुसरीकडे तिथे कॅमेरे लावल्याने मला संशय आला आणि मी शिवसैनिकांना कुठलाही अनुचित प्रकार करू नका असे सांगून मनोहर जोशी यांच्या घरावर न जाण्याचा निर्णय घेतला, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.

Updated : 24 July 2022 5:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top