Home > Politics > सचिन वाझे प्रकरण : EDने सिलेक्टीव माहिती लीक केली, अनिल देशमुख यांच्या वकिलांचा आरोप

सचिन वाझे प्रकरण : EDने सिलेक्टीव माहिती लीक केली, अनिल देशमुख यांच्या वकिलांचा आरोप

सचिन वाझे प्रकरण :  EDने सिलेक्टीव माहिती लीक केली, अनिल देशमुख यांच्या वकिलांचा आरोप
X

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे याने केलेल्या आरोपांप्रकरणी ED ने अनेक चुकीच्या गोष्टी मीडियापर्यंत पोहोचवल्या असा आरोप, अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी केला आहे. याप्रकरणाची जेव्हा जेव्हा सुनावणी असेल त्याच्या आधी वस्तुस्थितीपेक्षा विपरीत माहिती ED तर्फे दिली गेली, असा आरोप घुमरे यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घुमरे यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणात झालेली कारवाईसुद्धा हेतूपुरस्सर केली होती, असाही दावा त्यांनी केला आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी कऱणारी याचिका अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने आता निकाल राखून ठेवला आहे.

"EDचे दावे आणि सचिन वाझेच्या प्रतिज्ञापत्रात तफावत"

या पत्रकार परिषद घुमरे यांनी असेही सांगितले की, या प्रकरणात राज्य सरकारतर्फे माजी न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगापुढे सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पण सचिन वाझेने ED किंवा CBI यांच्यापुढे दिलेल्या जबाबत जी माहिती दिली आहे त्याचा कोणताही उल्लेख या जबाबामध्ये करण्यात आलेला नाही, असे घुमरे यांनी सांगितले. त्या प्रतिज्ञापत्रात आपण फेब्रुवारीमध्ये अनिल देशमुख यांना भेटल्याचा उल्लेख सचिन वाझे यांनी केलेला नाही. तसेच EDने ४. ७० कोटी रुपयांच्या वसुलीबाबत सिलेक्टीव्ह माहिती मीडियामध्ये लीक केली होती. पण सचिन वाझेच्या प्रतिज्ञापत्रात अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच जानेवारीमध्ये आपण एकदाच अनिल देशमुख यांना भेटलो होतो, असे सचिन वाझे याने आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलेले आहे. अनिल देशमुख, त्यांची पत्नी आरती देशमुख, त्यांचा मुलगा ऋषिकेश, यांना EDने समन्स बजावले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

"सचिन वाझेची पुनर्नियुक्ती परमबीर सिंग यांनीच केली"

अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट सचिन वाझे याला दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. पण परमबीर सिंग यांचे आरोप ऐकीव माहितीवरचे आहे, त्यात तथ्य नाही, असेही घुमरे यांनी सांगितले. तसेच सचिन वाझे याच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय परमबीर सिंग यांनीच घेतला होता. पोलीस आयुक्त म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखालीच नियुक्ती किंवा निलंबनाची कारवाई करणारी समिती कार्यरत असते. सचिन वाझे हा परमबीर सिंग यांच्या जवळचा असल्याने त्यांनीच त्याची नियुक्ती केली. या निर्णयांची फाईल गृहमंत्र्यांकडे जातच नसते, असेही घुमरे यांनी सांगितले.

Updated : 14 July 2021 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top