Home > Politics > 'मोदी आता चीनची वाट लावणार आहेत' ; सचिन सावंत यांची मोदींवर खोचक टीका

'मोदी आता चीनची वाट लावणार आहेत' ; सचिन सावंत यांची मोदींवर खोचक टीका

मोदी आता चीनची वाट लावणार आहेत ; सचिन सावंत यांची मोदींवर खोचक टीका
X

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यायामशाळेतील व्यायाम करतानाचा व्हिडीओ रिट्वीट करत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर खोचक टोला लगावला आहे. मोदी आता चीनची वाट लावणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचे डोळे लाल होणार आहेत, असं म्हणत सावंत यांनी म्हटले आहे. तसेच चीनकडून भारतात होणाऱ्या घुसखोरीच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरलं आहे.

सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, "मोदीजी आता "चीन"ची वाट लावणार आहेत. ते याची तयारी किती जोमाने करत आहे ते पाहा. थोड्याच वेळात त्यांचे डोळेही लाल होणार आहेत."

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेरठच्या व्यायामशाळेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोदी मेरठमधील मेजर ध्यानचंद खेळ विद्यापीठाचं भूमिपूजन करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लागलेलं व्यायामसाहित्याचं प्रदर्शन देखील पाहिलं. या ठिकाणी वेगवेगळे व्यायामाचे स्टॉल लागलेले होते. त्यांना मोदींनी भेट दिली. तसेच एका ठिकाणी व्यायाम करण्याच्या मशिनवर बसून स्वतः व्यायाम केला.

२०२२ च्या पहिल्याच दिवशी चीनने गलवान येथे ध्वज फडकवत एक व्हिडिओ जारी केला आहे. गलवान व्हॅलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, या व्हिडिओवरून केंद्रातील मोदी सरकार विरोधकांनी निशाणा साधला आहे. याच मुद्द्यावरून सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Updated : 3 Jan 2022 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top