Home > Politics > बजरंग खरमाटे यांच्या नावाने अनिल परब यांची बेनामी मालमत्ता- किरीट सोमय्या

बजरंग खरमाटे यांच्या नावाने अनिल परब यांची बेनामी मालमत्ता- किरीट सोमय्या

बजरंग खरमाटे यांच्या नावाने अनिल परब यांची बेनामी मालमत्ता- किरीट सोमय्या
X

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. परब यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांची सुमारे ७०० कोटींची मालमत्ता ही अनिल परब यांची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. खरमाटे यांचे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आलिशान घर आहे. या घराची पाहणी किरीट सोमय्या यांनी केली. तसेच हे घर १५ कोटींचे असल्याचा दावा करत ७०-८० हजार पगार असलेल्या खरमाटे यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून असा सवालही किरीट सोमय्या उपस्थित केला आहे. या व्यतिरिक्त खरमाटे यांची १५० एकर जमीन असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे सेक्रेटरी म्हणून काम करतात, तसेच खरमाटे यांची ७०० कोटींची मालमत्ता परब यांचीच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान अनिल परब यांना ईडीने नोटीस बजवाल्यानंतर बजरंग खरमाटे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. EDने मॅनी लॉँडरिंग प्रकरणी ही नोटीस बजावली आहे. खरमाटे यांना सोमवारी म्हणजेच आज ईडीच्या कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

Updated : 6 Sep 2021 8:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top