Home > Politics > विजयानंतर ऋतुजा लटके यांचा भाजपवर आरोप...

विजयानंतर ऋतुजा लटके यांचा भाजपवर आरोप...

विजयानंतर ऋतुजा लटके यांचा भाजपवर आरोप...
X

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ऋतुजा लटके 53 हजार पेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर नोटा ला सर्वाधिक 12 हजार 776 मतं मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून नोटाला मिळालेल्या मतांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि आरोप प्रत्यारोपांचा विषय बनला आहे.

ऋतुजा लटके यांनी विजयानंतर पत्रकार परिषदेत घेत विजयाचे श्रेय दिवंगत पती रमेश लटके आणि उद्धव ठाकरे यांना दिल आहे. रमेश लटकेंच्या राजकीय कारकिर्दीत जनसेवा आणि विकासाची काम केली , त्यांची अपूर्ण असलेली काम पूर्ण करणार अंधेरी पूर्व मतदार संघाचा विकास करणार असं सांगत या निवडणुकीत ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे आभार त्यांनी यावेळी मानले आहेत. यावेळी त्यांनी नोटाला जादा मिळालेली मत ही भाजपचीच चाल असल्याचा आरोप देखील केला लटकेंनी भाजपवर केलाय.

दरम्याम भाजपचे आशिष शेलार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, भाकप सह डझनभर पक्षांनी उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देऊनही त्यांना जास्त मतदान झालं नाही, भाजपने निवडणूक लढवली असती तर त्यांचा पराभव झाला असता'' असं म्हणत ऋतुजा लटकेंच अभिनंदन करत शेलार त्यांना चिमटा काढला आहे.

Updated : 6 Nov 2022 1:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top