Home > Politics > सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवार यांचा नारायण राणेंना टोला

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवार यांचा नारायण राणेंना टोला

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवार यांचा नारायण राणेंना टोला लगावला, जालन्यातील दादडगाव येथे ते बोलत होते.

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवार यांचा नारायण राणेंना टोला
X

मी ओबीसींमुळे मंत्री झालो असून मंत्रीपद ही काही बापाची खासगी जहागीरदारी नाही. त्यामुळे ओबीसीसाठी मंत्रीपद खपले तरी चालेल असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जालन्यातील दादडगाव येथे मंडल आयोग दिनानिमित्त सामाजिक न्याय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आम्ही राज्यात वेटींगवर आहोत असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा देखील वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. राणे वेटींग वर आहेत मग आम्ही काय ऑक्सिजनवर आहोत का? असा टोला लगावत सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही असं सांगायला ते विसरले नाहीत.

राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

Updated : 8 Aug 2021 8:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top