Home > Politics > बंडखोरांना सेनेत परतीचे मार्ग बंद? संजय राऊत यांचे संकेत

बंडखोरांना सेनेत परतीचे मार्ग बंद? संजय राऊत यांचे संकेत

काल रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रितिक्रिया दिल्या आहेत .

बंडखोरांना सेनेत परतीचे मार्ग बंद?  संजय राऊत यांचे संकेत
X

बंडखोरांना सेनेत परतीचे मार्ग बंद? संजय राऊत यांचे संकेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे निर्देश राज्यपालांनी ठाकरे सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली . त्यानुसार आज बहुमत चाचणी होणार होती त्याआधीच काल रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रितिक्रिया दिल्या आहेत .

'सर्वोच्च न्यायालय निर्णयानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नसतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे अशी विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण करण्यात आली हे त्यांनी संयमाने सांगितले आहे,त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला .'शिवसेनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो',असं मत शिवसेनेचे संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच आता मुख्यमंत्री कोण होणार आहे किंवा शिंदे गटाचा आता नेता कोण असेल याबद्दल अजिबात रस नसल्याचे राऊत यांनी म्हंटल आहे . त्यांना आता धुणीभांडीच करावी लागणार आहेत ,तसेच त्यांचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा असल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला . सरकार पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांना मिळालं होत त्यांनी ते केलं ,पण काहीही करणे देऊन शरद पवार आणि मला जबाबदार धरत असल्याचे राऊत म्हणाले.

'मी नेहमीच पक्षासोबत राहणार ,मी उद्या ईडी ला सामोरा जाणार आहे आणि जी कारवाई होईल त्याला सामोरे जाणार आहे तसेच मी पक्षाचे काम करू नये यासाठी असा दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत,तरीसुद्धा पक्षासोबत नेहमी काम करण्याचा मानस संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे . त्याचबरोबर मुख्यमंत्री त्या काळात नवीन होते पण त्यांचं नेतृत्व गुण काय आहेत ते महाराष्ट्र ने पहिले आहे,असा उद्धव ठाकरेंबद्दलचा आदरही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे .

Updated : 30 Jun 2022 6:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top