Home > Politics > मतदारसंघात पोहोचताच बंडखोर आमदारांचा संजय राऊतांवर हल्ला

मतदारसंघात पोहोचताच बंडखोर आमदारांचा संजय राऊतांवर हल्ला

मतदान केलेले ४२ जण तुमचे बाप आहेत हे सांगाल का, खासदार संजय राऊतांवर आमदार गायकवाड यांचा घणाघात...

मतदारसंघात पोहोचताच बंडखोर आमदारांचा संजय राऊतांवर हल्ला
X

शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत महाविकास आघाडी सरकार पाडले. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी या बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करत, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य देखील केली होती. पण आता एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर हे बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात पोहोचले आहेत. तसेच त्यांनी टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर हल्ला केला आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असा आरोप गायकवाड यांनी केला.

शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो. आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगावं आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यामुळे त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं, असे आव्हान आमदार संजय गायकवाड यांनी दिले. बुलडाण्यात परतल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यालयाला भेट दिली.

एवढेच नाही तर आमच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो असणारच, असेही त्यांनी म्हटले आहे. "प्रबोधनकार ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे सांगितल होते की, हा माझा बाळ मी माझ्या राष्ट्राला अर्पण करत आहे. बाळासाहेब ठाकरे हे देशातील 32 राष्ट्रपुरुषांपैकी एक राष्ट्रपुरुष आहेत. त्यामुळे राष्ट्रपुरुष कोणाच्या बापाचा नसतो तो देशाचा असतो. आमच्या बॅनर तसेच जे काही कार्यक्रम असतील त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो असणार म्हणजे असणार, असेही त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुनावले आहे.

आमदार संजय गायकवाड यांना पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे यांची चांगलीच खिल्ली उडविलीये. "आदित्य ठाकरे यांनी कधीच कोणत्याही आमदाराला नमस्कार केला नाही, आणि त्याचे डोळे दिसतील तर ते डोळ्यात डोळे घालतील, असा टोलाही त्यांनी लगावला.


Updated : 5 July 2022 2:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top