Home > Politics > 'मला मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालो असं वाटलं'- नितीन गडकरी

'मला मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालो असं वाटलं'- नितीन गडकरी

मला मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालो असं वाटलं- नितीन गडकरी
X

अहमदनगर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज अहमदनगर जिल्ह्यांत घोषणांचा धडाका लावला. यावेळी त्यांनी अनेक आमदारांनी रस्त्यांच्या कामांबाबतची निवेदनेही दिली. ही निवेदने घेतल्यानंतर गडकरींनी या आमदारांना मिष्किलपणे टोलाही लगावला. आमदारांनी बरीच निवेदने दिली. असं वाटतं, मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच खसखस पिकली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज नगरमध्ये 4 हजार कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.

त्यानंतर नितीन गडकरी यांनी नगरकरांशी संवाद साधत. तीन मोठ्या घोषणा केल्या. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा 548 राष्ट्रीय महामार्ग, तसेच जामखेड ते सौताडा या रस्त्याचं 135 कोटीचं काम आणि जामखेड शहरातून जाणारा जामखेड ते बीड जोडणारा महत्त्वाचा मार्गाच्या कामाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर दिली. सोबतच ही कामं लगेच सुरू होईल असं त्यांनी म्हटले. सोबतच निम्मन गाव येथे रेल्वे उड्डाण पुलाचं कामला त्यांनी मंजूरी दिली. तसेच नगर मनमाड हा शिर्डीला जोडणारा हा रस्ता आहे. त्याचंही काम त्यांनी मंजूर करत त्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी घोषणा गडकरी यांनी केली.

Updated : 2 Oct 2021 10:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top