Home > Politics > नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक?

नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक?

नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक?
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांना कोर्टाने दणका दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशीलात लगावण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात रत्नागिरी कोर्टाने निर्णय दिला आहे. राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज रत्नागिरी कोर्टाने फेटाळला आहे. त्यानंतर राणे यांनी तातडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तीन FIR रद्द करण्याची मागणी केली. एड.अनिकेत निकम हे नारायण राणे यांची बाजू मांडत आहेत.

दरम्यान पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी संगमेश्वरमध्ये नारायण राणे थांबलेल्या कार्यालयात पोहोचले आहेत. पण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांकडे अटक वॉरंट नाही, अशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. तसेच नारायण राणे यांना जबरदस्तीने अटक केली तर भाजप कार्यकर्ते त्यांना जाऊ देणार नाही, असा इशारा प्रमोद जठार यांनी दिला आहे.

Updated : 24 Aug 2021 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top