Home > Politics > उद्धव आणि रश्मी ठाकरे एक दिवस संजय राऊतांना चपलाने मारतील : नारायण राणे यांचे वक्तव्य.

उद्धव आणि रश्मी ठाकरे एक दिवस संजय राऊतांना चपलाने मारतील : नारायण राणे यांचे वक्तव्य.

उद्धव आणि रश्मी ठाकरे एक दिवस संजय राऊतांना चपलाने मारतील : नारायण राणे यांचे वक्तव्य.
X

नेहमीच वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे (Narayan Range) यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर यांना अंगावर घेत गंभीर आरोप केले आहे "संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील," असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

नारायण राणे म्हणाले, "एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे." "तेव्हा संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलाने मारलं नाही, तर मला विचारा," असं नारायण राणे यांनी म्हटलं.

राऊत ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळतो "राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. हा व्यक्ती मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा.असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका," असंही राणेंनी नमूद केलं.

"रामाचं कार्य असताना इथं रावणाचं काय काम" नारायण राणे म्हणाले, "राम कदम तीन हजार लोकांना काशी आणि सारनाथला घेऊन चालले आहेत. हे पवित्र कार्य आहे. अशावेळी माध्यमं संजय राऊतांविषयी बोलत आहेत. मात्र, रामाचं कार्य असताना इथं रावणाचं काय काम आहे."

"माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती" "मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत. मी संपूर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही," असं म्हणत राणेंनी राऊतांना टोला लगावला.

एकंदरीतच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या सत्र सुरू झाल्या असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत या आरोपांना अधिक धार येईल, असं राजकीय निरीक्षकांचे म्हणणं आहे.

Updated : 7 Jan 2023 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top