News Update
Home > Politics > मोदींच्या मंत्र्यांचा मोदींवर भरोसा नाही... म्हणाले "मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही"

मोदींच्या मंत्र्यांचा मोदींवर भरोसा नाही... म्हणाले "मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही"

मोदींच्या मंत्र्यांचा मोदींवर भरोसा नाही... म्हणाले मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही
X

"नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आपल्यावर आणि राज्यावर आहे. पण त्यांच्या एकटयाच्या नावानं मतं मिळतील याची काही शाश्वती नाही. मतदार मोदींच्या नावे मतं देतील असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागळात काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मतदान मत देतील हे त्यांच्यावरच अवलंबून आहे" असं वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये असलेल्या नियोजन आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री इंद्रजित सिंह यांनी केलं आहे. भाजप हरियाणामध्ये येत्या निवडणुकीत तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

दरम्यान भाजपला भुतो ना भविष्यती असं यश नरेंद्र मोदी यांच्या काळात मिळालं. मोदी यांच्यामुळं लोकांनी उमेदवार न बघता 2014 आणि 2019 ला भाजपला मतदान केलं. मोदी हे आत्तापर्यंतचे भाजपचे जनतेमधील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं अनेक सर्व्हेक्षणातून दिसून आलं आहे.

मात्र, असं असताना भाजपला तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी मोदींवर आपण निर्भर राहू शकत नाही. असं वक्तव्य इंद्रजित सिंह यांनी केल्यानं भाजपच्या नेत्यांचा आता मोदींवर भरोसा राहिला नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. या संदर्भात त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Updated : 14 Oct 2021 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top