Home > Politics > सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक विजयानंतर राणेंच लक्ष्य `महाराष्ट्र`

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक विजयानंतर राणेंच लक्ष्य `महाराष्ट्र`

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक विजयानंतर राणेंच लक्ष्य `महाराष्ट्र`
X

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहीलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत पुढील लक्ष्य `महाराष्ट्र` असल्याचं म्हटलं आहे

गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोप आणि संघर्षमय ठरलेल्या तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल आज हाती आले असून त्यामध्ये नारायण राणे यांच्या सिंद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आले आहेत. भाजपाचे ११ संचालक आणि विरोधी पॅनलचे ८ संचालक निवडून आल्यानंतर भाजपानं या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं.

गायब असलेल्या नितेश राणे अद्याप सापडलेले नाही. `गाडलाच` असं एका शब्दाची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी मात्र पत्रकार परीषद घेऊन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या विजयानंतर आता लक्ष्य राज्यातली सत्ता असल्याचं देखील विधान करत राणेंनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

भाजपाची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेनं घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला", असं राणे म्हणाले. विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

जिल्हा बँकेतील या मोठ्या विजयानंतर आता पुढील नियोजन काय असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच नारायण राणे यांनी राज्यातील सरकारकडे रोख करत "आता यानंतरचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचं आहे", असं राणे म्हणाले. "आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. तिन्ही जिल्ह्यात ज्या काही विधानसभा होतील, त्यासोबत लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेले, ज्यांचे चेहरे पाहवत नाहीत, अशा लोकांना आमचा जिल्हा लोकप्रतिनिधीपदी ठेवणार नाही", असा खोचक टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.आता महाराष्ट्राकडे लक्ष्य म्हणजे तिथे थोडक्यात आमची सत्ता हुकली आहे. राज्याला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. हे राज्य किमान १० वर्ष तरी अधोगतीकडे चाललंय.आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, लगानची टीम नकोय", असं राणे यावेळी म्हणाले.

Updated : 31 Dec 2021 11:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top