Home > Politics > शिवसेनेचीच आहे नारायण राणेंची भाषा... ; कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांची टीका

शिवसेनेचीच आहे नारायण राणेंची भाषा... ; कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांची टीका

शिवसेनेचीच आहे नारायण राणेंची भाषा... ; कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांची टीका
X

मुंबई :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून टीका केली आहे."शिवसेनेचीची आहे नारायण राणेंची भाषा, आता महाविकास आघाडीतील लोकांनी मारत बसा माशा", "आता सरकारकडून लोकांना नाही अजिबात आशा, म्हणून नारायण राणेंकडून पाहायला अशी तुम्हाला अशी भाषा" अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

नारायण राणे यांच्या अटकेवरून भाजप - शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे, एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीबाबत आक्षेपार्ह विधान करण्यावरून शिवसेना नारायण राणेंविरोधात आक्रमक झाली, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली त्यांना जामीनही झाला. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत आहे. आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत भाजपकडून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. खरतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना राणेंच्या विधानाचे समर्थन भाजप करणार नाही, मात्र सरकारकडून राणेंविरोधात केलेली अटकेची कारवाई म्हणजे राजकिय सुडातुन केलेली कारवाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच शिवसेनेच्या नेत्यांना कोर्टात खेचणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यात पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले नारायण राणे यांच्या भाषेवरून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, नारायण राणे यांची ती बोलण्याची 'स्टाईल' आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे, तर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील नारायण राणे यांनी भाषा ही शिवसेनेचीच आहे असं कवितेच्या माध्यमातून म्हटले आहे.

Updated : 25 Aug 2021 4:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top