Home > Politics > राममंदीर घोटाळ्याचे पुढे काय?

राममंदीर घोटाळ्याचे पुढे काय?

राममंदीर घोटाळ्याचे पुढे काय?
X

मोठा गाजावाजा करत भुमिपुजन झालेल्या राममंदीर आता घोटाळ्यांच्या गर्तेत अडकले असून ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून या प्रकरणाची आता दुरुस्ती करण्याचे काम सुरु झाले आहे.

अयोध्या ट्रस्ट राममंदिर भूखंड घोटाळा कोणत्या ना कोणत्या कारणाने सद्या सातत्याने चर्चेत येत आहे : चित्रकूट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चित्रकूट येथील पाच दिवसीय संमेलनात राम जन्मभूमी ट्रस्टमधील भूखंड घोटाळ्यावरही चर्चा झाली. या प्रकरणात उद्भवलेल्या वादानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची सरचिटणीसपदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि, प्रत्यक्षात तसे घडले नाही. चित्रकूट येथे दाखल झालेल्या राय यांनी प्रतिनिधींसमोर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांना तूतांस सशर्त अभयदान देण्यात आले आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पष्टीकरणाने संघ नेत्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे संघाच्या नाराजीनंतर अयोध्येतील ट्रस्टवर संकटाचे वादळ घोंघावू लागले आहे. तर या प्रकरणात चंपत राय यांनी कोणतीही विधाने करू नये, अशी सक्त ताकीद रा. स्व. संघ नेत्यांनी दिली असल्याची माहिती. सूत्राने दिली.

याच एका अटीवर त्यांना पदावर तूर्तास कायम ठेवण्यात आले आहे. यासोबतच या प्रकरणात कुठे ना कुठे चूक झाली असल्याचेही संघाने म्हटले आहे. या घोटाळा प्रकरणामुळे संघाची प्रतिमाही मलिन झाली आहे. यासोबतच या वादाने जर जोर धरला तर चंपत राय यांना पदही सोडावे लागू शकते, असेही संघाने स्पष्ट केले आहे. चंपत राय यांच्याबाबत संघाची सध्या द्विधा मन:स्थिती झाली आहे. उत्तरप्रदेशसह पाच राज्यात निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा स्थितीत चंपत राय यांना हटविण्यात आले तर आरोपांची पुष्टी संघानेच केल्यासारखे होईल. जर विरोधी पक्षाने राम जन्मभूमी भूखंड घोटाळा प्रकरणात झालेल्या वादानंतर कोणतीही कारवाई न झाल्याचा मुद्दा उचलला तर मात्र हिंदूंच्या भावनेलाही धक्का बसू शकतो.

घोटाळा प्रकरणावरील वाद शमविण्यासाठीच संघाने नव्याने रणनीती आखली असून हा मुद्दा तप्त झाला तर मात्र राय यांना पदाचा राजीनामा | देण्याचा आदेश देण्यात येण्याचीच शक्यता आहे. तर निवडणुका होईपर्यंत चंपत राय यांना पदावरून हटविण्यात येऊ नये परंतु वाद वाढलाच तर मात्र राय यांना राजीनामा द्यावा लागू शकतो.

कायदेशीर मार्गानेच सर्व व्यवहार चंपत राय म्हणाले,नैतिकता आणि कायदा या मर्यादितच सर्व व्यवहार केला असल्याचे स्पष्टीकरण चंपत राय यांनी संघ नेत्यांना दिले. असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंदिरासाठी जो भूखंड खरेदी करण्यात आला तो वास्तुशास्त्राच्या दृष्टीने उपयुक्त होता असा दावाही त्यांनी केला.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले संघाची प्रतिमा मलीन

चंपत राय यांनी ज्यावेळी स्पष्टीकरण दिले त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि पाचही सरकार्यवाह आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या आरोपामुळे मोठे नुकसान झाले असून सघाची प्रतिमाही मलिन झाली असल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले. सोबतच राय यांच्या स्पष्टीकरणावर असमाधानी असल्याचे माहिती त्यांनी नेत्यांना दिले.

Updated : 2021-07-13T14:11:11+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top