Home > Politics > १२ आमदारांच्या यादीमधून नाव वगळल्यानंतर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

१२ आमदारांच्या यादीमधून नाव वगळल्यानंतर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

१२ आमदारांच्या यादीमधून नाव वगळल्यानंतर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
X

महाविकास आघाडी सरकारतर्फे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमधून राजू शेट्टी यांचे नाव वगळले असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "प्रत्येकाची वेळ येत असते, हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे," अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. विधान परिषदेची आमदारकी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साध्य नाही, आमदारकी नाही मिळाली म्हणून आमच्याकडे 10-20 लोक आत्महत्या करतील असे काही नाही, असे म्हणत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आणायचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणुकीपूर्वी झालेल्या समझोत्यानुसार काँग्रेसने स्वाभिमानीला सांगलीची जागा दिली. तसेच सत्ता आली किंवा नाही आली तरी राष्ट्रवादीने विधान परिषदेवर जागा देण्याचे आश्वासन दिले होते, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

Updated : 3 Sep 2021 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top