Home > Politics > ठाकरे सरकार किती दिवस टिकेल, राजू शेट्टी म्हणाले...

ठाकरे सरकार किती दिवस टिकेल, राजू शेट्टी म्हणाले...

ठाकरे सरकार किती दिवस टिकेल, राजू शेट्टी म्हणाले...
X

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तात्काळ 25 टक्के ॲडव्हान्स नुकसान भरपाई वीमा कंपन्यांनी द्यावी अशी मागणी करत यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्यांना आदेश द्यावेत अशी सूचना शेट्टी राज्य सरकारला केली आहे.

वीमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत आहेत, त्यामुळे हे तात्काळ थांबावेत आणि वीमा कंपन्यांच्या मुसक्या राज्य सरकारने आवळाव्यात, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. असा इशाराही शेट्टी यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र बंद संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं ते म्हणाले.... शेतकऱ्यांसाठी चा बंद होता, त्यामुळे आम्ही या बंदला पाठिंबा दिला होता, मात्र महाविकास आघाडीच्या कुठल्याच नेत्याने स्वाभिमानीच्या नेत्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याचे साधे औचित्यही दाखवले नाही, त्यामुळे स्वाभिमानाचे कार्यकर्ते रस्त्यावर दिसले नाहीत. असं मत शेट्टी यांनी व्यक्त केलं.

केंद्र सरकार ने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं, आणि राज्य सरकार देखील शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मी सध्या सर्वांवर नाराज आहे. असं मत शेट्टी यांनी व्यक्त केलं. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या शेट्टी यांना हे ठाकरे सरकार किती वर्ष टिकेल असा सवाल केला असता नाराज असलेल्या शेट्टी यांनी जोपर्यंत सत्तेची लालसा जिवंत आहे. तोपर्यंत हे सरकार टिकेल. अशा निशाणा ठाकरे सरकारवर साधला आहे.

Updated : 12 Oct 2021 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top