Home > Politics > संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शरद पवार यांच्या भेटीला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शरद पवार यांच्या भेटीला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शरद पवार यांच्या भेटीला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शरद पवार यांच्या भेटीला, सोबत CDS जनरल बिपिन रावत आणि सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शरद पवार यांच्या भेटीला
X

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज 16 जुलैला कॉंग्रेस नेते एके एंटनी (AK Antony) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

या भेटी दरम्यान चीन आणि भारताच्या सीमेवरील सद्यस्थितीची उभय नेत्यांना संरक्षण मंत्र्यांनी माहिती दिली. एंटनी आणि शरद पवार दोघंही देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले आहेत.

विशेष म्हणजे या बैठकीत CDS जनरल बिपिन रावत आणि सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे देखील उपस्थित असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

राजनाथ सिंह आणि दोन माजी संरक्षण मंत्र्यांची ही बैठक लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनापुर्वी झाली आहे. 19 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरु होत आहे. दरम्यान मध्यंतरी माध्यमांमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. त्यानंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

मागील वर्षी गलवान घाटीत दोनही देशाचे सैनिक आमने सामने आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी आम्ही चीन विरोधात सरकार सोबत असल्याचं म्हटलं होते.

तेव्हा पासून आत्तापर्यंत भारताचे चीन सोबतचे संबंध तणावपुर्ण राहिले आहेत. पूर्व लद्दाख मधील पैंगोंग सो झील सोडता चीनी सेना अद्यापर्यंत मागे हटलेली नाही.

येत्या अधिवेशनात कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

Updated : 16 July 2021 3:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top