Home > Politics > एकनाथ खडसेंच्या CDची वाट पाहतोय – राज ठाकरे

एकनाथ खडसेंच्या CDची वाट पाहतोय – राज ठाकरे

एकनाथ खडसेंच्या CDची वाट पाहतोय – राज ठाकरे
X

आपल्यामागे ED लावली तर आपण CD लावू असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आता. आता ED त्यांच्यामागे लागली आहे, त्यामुळे सीडीची वाट पाहतोय असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज राठकरेच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे. काँग्रेस सत्तेत असतांनाही असाच गैरवापर झाला होता आणि भाजप असतांनाही तोच वापर होतोय. पण केंद्रीय तपास यंत्रणांचा बाहुली म्हणून वापर करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

मराठा आणि ओबीसी समाजाचा राजकारणासाठी वापर – राज ठाकरे

ओबीसी आणि मराठा ओबीसी समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जातो आहे, या शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मराठा आणि ओबीसी समाजाला सवालही विचारला आहे. निवडणुकांमध्ये आश्वासन देऊन भरघोस मत घेणाऱ्या पक्षांना हे समाज जाब कधी विचारणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईत मोर्चा निघाला होता, त्यावेळी सगळेच नेते गेले होते, त्यांना जर आरक्षण मान्य आहे तर मग अडलंय कुठे, केंद्र सरकारला मान्य आहे राज्य सरकारला मान्य आहे मग आरक्षणाचे घोडे अडवलंय कुठे? असा सवाल त्यांनी विचारला. कोर्टात व्यवस्थित भूमिका मांडली जात नाही का, फक्त माथी भडकवायची आहेत का असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

Updated : 11 July 2021 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top