Home > Politics > "कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल" राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

"कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल" राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
X

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीतही आंदोलन सुरूच ठेवले आहे. यामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी निघालेल्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. पण सरकारने आता संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण अशी कारवाई न कऱण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, "एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल."

राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटले आहे ते पाहूया...

प्रति,

मा. श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

महोदय,

करोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातच. एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा ही एसटी कर्मनात्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये काम सुरु आहे. तिथेही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत. ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचान्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचान्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास वा गोष्टीमुळे एसटी कर्मचान्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. आज गरज आहे ती एसटी कर्मचान्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची 'एसटी कर्मचारी कामगार जंगला, तरच एसटी जगेल हे भान बाळगण्याची माझी आपल्याला आमहानी विनंती आहे की, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी कामगारांमधील उद्रेक होईल.

माझ्या या मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि योग्य ते आदेश परिवहन मंत्री तसंच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना, हीच अपेक्षा,

राज ठाकरे

Updated : 4 Nov 2021 1:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top