Home > Politics > राज ठाकरे धावले भाजपच्या मदतीला

राज ठाकरे धावले भाजपच्या मदतीला

राज ठाकरे धावले भाजपच्या मदतीला
X

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे. त्यातच अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीवेळी भाजपने उमेदवार मागे घेण्याची विनंती राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर भाजपने राज ठाकरे यांच्या विनंतीला मान देत अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतून मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी सर्वपक्षीयांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहीले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राज ठाकरे भाजपच्या मदतीला धावून आले असल्याचे म्हटले जात आहे.

Updated : 5 Feb 2023 5:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top