Home > Politics > "हे एका पंतप्रधानाला शोभत नाही" राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा नरेंद्र मोदी

"हे एका पंतप्रधानाला शोभत नाही" राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा नरेंद्र मोदी

हे एका पंतप्रधानाला शोभत नाही राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा नरेंद्र मोदी
X

''देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य हे त्यांच्यासाठी समान मुलांप्रमाणे असले पाहिजे. आपण स्वतः गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे हे एका पंतप्रधानाला शोभत नाही'' असं म्हणत राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्यावरती निशाणा साधला आहे.

हे एका पंतप्रधानाला शोभत नाही...

पुण्यात (Pune) काल सुरू झालेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात काल राज ठाकरे यांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. मुलाखतकाराने राज ठाकरे यांना देशात संघराज्याची चौकट मोडून एकाच राज्याला सातत्याने प्राधान्य दिले जात आहे असं वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी हे मीच यापूर्वी देखील बोललो आहे असं म्हणत ''ज्यावेळी मी हे बोललो होतो त्यावेळी सगळ्यांचा शहामृग झाला होता. सर्वांनी माना खाली घातल्या होत्या. आणि माझं आजही तेच म्हणणं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य हे त्यांच्यासाठी समान मुलांप्रमाणे असले पाहिजे. आपण स्वतः गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे हे एका पंतप्रधानाला शोभत नाही'' (Just because he is from Gujarat) असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधला आहे.

मी बैलासारखा मुतत विचार करत नाही..

ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी मी सर्वात प्रथम बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड यांचा विकास झाला पाहिजे असं म्हणालो होतो. अशी माझी भूमिका होती. त्यानंतर 2019 मध्ये लावरे तो व्हिडिओ मधून राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली होती. या सगळ्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''एखाद्या भूमिकेला विरोध करणं राजकारणात गैर नसतं. जर एखाद्या माणसाने चांगलं काम केलं तर त्याचे अभिनंदन करावं इतका मोठेपणा आणि मोकळेपणा तुमच्यात असला पाहिजे. 2019 नंतर झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये 370 कलम रद्द होणे, राम जन्मभूमीचा विषय मार्गी लागणं असा अनेक चांगल्या गोष्टी सरकारकडून झाल्या त्याचं मी अभिनंदन केलं. मी बैलासारखा मुतत माझा विचार करत नाही. मी जो विचार करतो तो सरळच विचार करतो.

"लाव रे तो व्हिडिओ' वरून वारंवार प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे भडकले..

राज ठाकरे यांच्या या मुलाखतीत मुलाखतकार वारंवार 'लाव रे तो व्हिडिओ' याविषयी राज ठाकरेंना प्रश्न विचारत होते. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ हे 2014 चा कॅम्पेन होतं. ते तेवढेच काय घेऊन बसला आहात. असं म्हणत तुम्ही पत्रकार आहात तुम्ही जे काल लिहिलं तेच आज लिहिलं नाही असं तुम्हाला कोण विचारतं का? परवा दिवशी जो विषय तुम्ही मांडला तो आज मांडला नाहीत? असं तुम्हाला कोणी बोललं का? तो त्या त्या वेळेचा विषय असतो. तो त्यावेळी मांडला परत तशी वेळ आली तर परत मांडेन असं म्हणत त्यांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं आणि त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

Updated : 9 Jan 2023 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top