Home > Politics > शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया...

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज एक ट्विट करुन केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निकालावर आपले मत व्यक्त केले आहे. नेमके हे ट्विट आणि व्हिडिओ काय आहे तो पाहा...

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया...
X

केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यभरात शिंदे गटांकडून मोठा जल्लोष सुरु झाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी ट्विट व्हायरल झाले आहे.

या व्हायरल ट्विटमधून राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची एक ३० सेकंदाची क्लिप पोस्ट केली आहे. ज्यामध्ये "नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो पण एकदा गेलेलं नाव पुन्हा येत नाही," असा संदेश दिला आहे. या पोस्टसोबत त्यांनी "बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं," असे कॅप्शनही दिले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाला आहे. तसेच हा भारतीय घटनेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, त्यामुळे जो संघर्ष केला, बाळासाहेबांची विचार भूमिका घेवून सत्ता स्थापन केली. त्याता हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated : 17 Feb 2023 3:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top