Home > Politics > ''स्वार्थासाठी दिसेल त्याचा हातात... '' उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंची टीका

''स्वार्थासाठी दिसेल त्याचा हातात... '' उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंची टीका

स्वार्थासाठी दिसेल त्याचा हातात...  उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंची टीका
X

पुन्हा हिंदुत्व आणि मराठी हाच आपला पुढचा मुद्दा असेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत आज स्पष्ट केलंय. राज यांनी पुन्हा एकदा मशिदीवरचे भोंगे आणि हनुमान चालीसा आंदोलनावर भाष्य केलंय. आपल्या विविध आंदोलनाची माहिती आणि त्यातून मिळालेले यश पुस्तक रुपी मांडणार असल्याचीही माहिती दिली.

उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

काल परवा तब्बेतीचे कारण सांगणारे आता कुठे आहेत असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केलाय. एकनाथ शिंदेंनी कांडी फीरवल्यानंतर आता उद्धव ठाकरे फिरत आहेत. स्वार्थासाठी वाटेल त्याचा हातात हात घ्यायचा.हे आम्ही करत नाही,मराठीचा मुद्दा असो की हिंदुत्वचा आमची भूमिका बदलत नाही, उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकही गुन्हा नाही, कारण कधीच भूमिका घ्यायची नाही. फक्त मला सत्तेत बसवा असा घणाघात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय.

आम्ही आंदोलने करत होतो त्यावेळी हिंदुत्व हिंदुत्व करणारे कुठे होते असा सवालही राज ठाकरे यांनी केलाय. आगामी मुंबई महापालिका निवडनूकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेच्या टार्गेट वर राहील असा संकेतच राज ठाकरेंनी या सभेवरून स्पष्ट होतेय.


Updated : 27 Nov 2022 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top