Home > Politics > Pune : राज ठाकरे पावसाला घाबरले? , सभा रद्द करण्याचा घेतला निर्णय

Pune : राज ठाकरे पावसाला घाबरले? , सभा रद्द करण्याचा घेतला निर्णय

Pune : राज ठाकरे पावसाला घाबरले? , सभा रद्द करण्याचा घेतला निर्णय
X

भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा जाहीर केला आहे. तर त्याआधी राज ठाकरे पुणे शहरात जाहीर सभा घेणार होते. मात्र ही सभा ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद शहरात घेतलेल्या सभांमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे पुणे शहरात राज ठाकरे यांच्या सभेला पोलिस परवानगी देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे पुणे शहरात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पुणे शहरात होणारी राज ठाकरे यांची सभा मनसेने रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.

राज ठाकरे यांची 21 मे रोजी पुणे शहरात जाहीर सभा होणार होती. या सभेची मनसेने जोरदार तयारी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यानंतर राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पावसाचे कारण देत राज ठाकरे यांची सभा रद्द करत असल्याची घोषणा मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर यांनी केली.

हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे पुणे शहरात होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. मात्र ही सभा पुढच्या आठवड्यात होणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे यांची सभा रद्द होणार का? अशी चर्चा रंगु लागली आहे. त्यातच बाळासाहेब ठाकरे यांनी पावसातदेखील सभा घेतली असल्याची आठवण सांगत राज ठाकरे पावसाला घाबरले का? असा सवाल सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.

Updated : 18 May 2022 2:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top