Home > Politics > रेल्वेचे खासगीकरण होणार नाही, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर

रेल्वेचे खासगीकरण होणार नाही, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर

रेल्वेचे खासगीकरण होणार नाही, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर
X

रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा होत असतानाच रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या.मुंबईतील (Mumbai) रेल्वे स्थानकांच्या बाजूला रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या अनेक झोपडपट्ट्या (Slum) आहेत. मात्र सध्या रेल्वे स्थानकांच्या विकासाची योजना आखण्यात आल्याने या झोपडपट्टीधारकांना बेघर होण्याची वेळ येईल. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रित येऊन याबाबत धोरण ठरवावे. मात्र यासंदर्भात सरकार धोरण ठरवणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विचारला.

यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी उत्तर देतांना गोरगरिबांना समोर ठेऊनच विकास करण्यात येईल, असं मत व्यक्त केले. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, माझ्या कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये सरकार खासगी भागिदारांना सहभागी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशा प्रकारे खासगी विकासकांना सहभागी करून न घेता याबाबत थेट सरकार हे पुनर्विकासाचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच रेल्वेचे खासगीकरण (Railway privatization) होणार नसल्याचेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Updated : 8 Feb 2023 7:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top