Home > Politics > #IndiaOnSale म्हणत राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

#IndiaOnSale म्हणत राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

#IndiaOnSale म्हणत राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका
X

नवी दिल्ली : NMP अर्थात नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन वरुन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर #IndiaOnSale या हॅशटॅगसह लिहलंय, की "सर्वात आधी विश्वास विकला आणि आता.." त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 वर्षात जनतेच्या पैशाने बनवलेली देशाची संपत्ती त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना विकत आहेत. असं म्हटलं होतं.






याच मुद्द्यावर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पलटवार केला आहे. सीतारमन यांनी राहुल गांधी यांना,'तुम्हाला मुद्रीकरण समजते का?' असा सवाल केला आहे. काँग्रेसनेच देशाची संसाधने विकली आणि त्यात लाच घेतली." असं सीतारमन म्हणाल्या. काँग्रेस सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे 8,000 कोटी रुपये उभारण्यासाठी मोनेटाइजेशन केलं, 2008 मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकासाठी प्रस्ताव मागवण्या आले होते. "जर ते खरोखरच मुद्रीकरणाच्या विरोधात होते, तर राहुल गांधींनी NDLS च्या मुद्रीकरणासाठी RFP का नाही फाडले? नवी दिल्ली रेल्वे स्टेशन विकले का? त्याची मालकी आता भाऊजीकडे आहे का? मुद्रीकरण म्हणजे काय हे त्यांना माहीत आहे का? असा सवाल सीतारमन यांनी करत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.


Updated : 26 Aug 2021 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top