Home > Politics > नाना पटोले यांच्या स्वबळाला राहुल गांधी यांचा हिरवा कंदील

नाना पटोले यांच्या स्वबळाला राहुल गांधी यांचा हिरवा कंदील

नाना पटोले यांच्या स्वबळाला राहुल गांधी यांचा हिरवा कंदील
X

आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी एच के पाटील आणि केसी वेणुगोपाल राव देखील उपस्थित होते.

नाना पटोले यांनी राज्यात कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. नाना पटोले यांच्या या घोषणेमुळं महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल. अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले यांच्या एकला चलो रे च्या नाऱ्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादीसह शिवसेनेची काय भूमिका असेल पाहणं महत्त्वाचं आहे.

Updated : 20 July 2021 2:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top