Home > Politics > लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? राहुल गांधी यांनी केलं स्पष्ट

लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? राहुल गांधी यांनी केलं स्पष्ट

लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? राहुल गांधी यांनी केलं स्पष्ट
X

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान लग्नाचा प्रश्न एका युटूबरने त्यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर खूप मनोरंजक होते. राहुल गांधी त्यांच्या आजी इंदिरा गांधींबद्दल बोलत होते. ते म्हणाले इंदिरा गांधीयांना आयर्न लेडी म्हणण्याच्या आगोदर गुंगी गिडिया असं म्हंटल जात होत. आजी आणि माझे नाते संबंध कसे होते? हे सांगताना राहुल गांधी म्हणाले की, इंदिरा गांधी माझी दुसरी आई आहे. या मुलाखतीत इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांच्याविषयी चर्चा सुरु असताना मुलाखत घेण्याऱ्या व्यक्तीने त्यांना तुम्हाला आजी इंदिरा गांधी यांच्यारारखीच मुलगी लग्नासाठी हवी आहे का? असा प्रश्न विचारला आणि त्यावर मिळालेलं उत्तर काय होतं पहा...

सध्या देशात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा सुरु आहे. या यात्रेत कधी राहुल गांधीयांना कपड्यांवरून टार्गेट केलं जातंय तर कधी शूज वरून. इतकंच काय त्यांना ज्या प्रकारे मुली भेटत आहेत भेटल्यानंतर त्या त्यांचा हात हातात घेत आहेत. त्यांना प्रेमाने चुंबन देत आहेत. यावरून देखील त्यांना बऱ्याच प्रमाणावर ट्रोल केले गेलं. आता या सगळ्या नंतर राहुल गांधी यांच्या लग्नाविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. एका मुलखातील विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी त्यांना कोणते गुण असलेली मुलगी हवी आहे? याच उत्तर दिल आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका युटूबरने त्यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत त्यांना लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आहे आणि त्यावर त्यांनी त्यांना आजी व आई या दोघींचे गुण असलेली मुलगी हवी असल्याचं सांगितलं..

यावेळी राहुल गांधी, इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांच्याविषयी बोलतं होते. त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला अशा मुलीशी लग्न करायचे आहे का? ज्यात तुमच्या आजीसारखे गुण आहेत. लग्नासाठी अशी मुलगी हवी आहे का? यावर राहुल म्हणाले ''हा एक मनोरंजक प्रश्न आहे. मला अशी स्त्री हवी आहे जिच्यात माझी आई आणि आजी दोघांचेही गुण आहेत. ते बर होईल.''

भारत जोडो यात्रेदरम्यान लग्नाच्या प्रश्नाला राहुल गांधींनी उत्तर दिले. मॅशेबल इंडिया या यूट्यूब चॅनलच्या बॉम्बे जर्नी स्पेशल एपिसोडमध्ये ते मुलाखत देत होते. ही मुलाखत मंगळवारी यूट्यूबवर प्रसारित झाली आहे..

Updated : 1 Jan 2023 12:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top