Home > Politics > Rahul Gandhi : माझ्या हाती सर्व यंत्रणा द्या आणि मग पहा...

Rahul Gandhi : माझ्या हाती सर्व यंत्रणा द्या आणि मग पहा...

Rahul Gandhi : माझ्या हाती सर्व यंत्रणा द्या आणि मग पहा...
X

हिटलरच्या हाती सर्व संस्था होत्या. त्यामुळे तो निवडणूका जिंकायचा. मात्र माझ्या हाती देशातील सर्व संस्था द्या. मग मी दाखवून देतो की, निवडणूका कशा जिंकल्या जातात, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडली.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ED कडून चौकशी सुरू आहे. त्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महागाई, जीएसटी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यापुर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, देशात लोकशाहीचा मृत्यू होत आहे. मात्र देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नसून ती पुर्ण संपलेली आहे. त्यामुळे आज देश फक्त चार लोकांच्या हाती असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात बेरोजगारी, महागाई, समाजात वाढत असलेला अन्याय याविरोधात आमची लढाई सुरू आहे. मात्र आम्हाला आडवलं जात आहे. देशात महागाई वाढत आहे. त्यामुळे मीडियाला हिंमत करून मोदी सरकारला प्रश्न विचारावे लागतील.

राज्यसभा लोकसभा सुरू असताना मल्लीकार्जून खर्गे यांना सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले जाते, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला. विरोधी पक्षाला निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था या सारख्या संस्थांविरोधातही लढावे लागत आहे. कारण या सर्व संस्थांमध्ये आरएसएसचे लोक बसले आहेत. त्यामुळं आम्ही फक्त राजकीय पक्षाविरोधात लढत नाही तर आम्हाला सर्व संस्था विरोधात लढावं लागत नाही. आम्ही जर राजकीय विरोध केला तर आमच्या मागे संस्था लावल्या जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तर आमच्या काळात या संस्था न्युट्रल होत्या, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

तसंच पुढं बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे मत देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसंच देशात महागाई वाढत असल्याचे अर्थ मंत्र्यांना दिसत नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी पुढं म्हणाले, जितकं मी खरं बोलतो तितका माझ्यावर आक्रमण केलं जातं. मी महागाई विरोधात बोलतो. मी बोलत राहणार. मी घाबरणार नाही. जे घाबरतात तेच घाबरण्याचे प्रयत्न करतात, असं म्हणत पंतप्रधान मोदी आपल्याला घाबरत असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला.

राहुल गांधी यांना यावेळी पत्रकाराने विचारले की, तुम्हाला भीती वाटत नाही का? या प्रश्नावर उत्तर देतांना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भीतच नाही. तर मग भीतीला तोंड द्यायचा प्रश्नच नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारा की मी घाबरतो का? ते अगदी खरं काय ते सांगतील. याबरोबरच सरकारच्या विरोधात जो बोलतो त्यांच्याविरोधात या संस्था तुटून पडतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. गांधी परिवाराविरोधात हे लोक का हल्ला का करतात? या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, गांधी विचारधारा आहे. आम्ही लोकशाहीसाठी लढतो. जेव्हा हिंदू मुस्लीम केलं जातं तेव्हा आम्ही लढतो एक परिवार नाही. एक विचारधारा आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

Updated : 5 Aug 2022 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top