Home > Politics > Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी संजीवनी ठरणार?

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी संजीवनी ठरणार?

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी संजीवनी ठरणार?
X

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज कन्याकुमारीमधून सुरूवात होत आहे. ऑगस्ट क्रांती दिनाला 80 वर्षे पूर्ण झाले. त्या निमित्ताने काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेची घोषणा करण्यात आली होती. ०९ ऑगस्टला कॉंग्रेसकडून भारत जोडो यात्रेची घोषणा करण्यात आली होती. या अगोदर 2 ऑक्टोबरला ही यात्रा सुरू होणार होती, मात्र, नंतर तारखेत बदल करण्यात आला.

७ सप्टेंबरला राहुल गांधी तामिळनाडूतल्या श्रीपेरांबदुरला भेट देणार आहेत. याच ठिकाणी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ते संध्याकाळी कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहेत.

कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी यांची ही यात्रा चालणार आहे.

किती दिवस चालणार यात्रा

150 दिवस, 12 राज्य, 3500 किमी प्रवास

राहुल गांधी Active मोडमध्ये…

४ सप्टेंबरला देशातील वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसने महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला देशभरातील कॉंग्रेस नेते उपस्थित होते.

5 ऑगस्टला दिल्लीत महागाई विरोधात कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं होतं.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह कॉंग्रेस खासदारांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Updated : 7 Sept 2022 7:59 AM IST
Next Story
Share it
Top