Home > Politics > विकले जाणारे लोक भाजपमध्ये जात आहेत, रवींद्र आंबेकर यांच्या प्रश्नाला राहुल गांधी यांचे उत्तर

विकले जाणारे लोक भाजपमध्ये जात आहेत, रवींद्र आंबेकर यांच्या प्रश्नाला राहुल गांधी यांचे उत्तर

विकले जाणारे लोक भाजपमध्ये जात आहेत, रवींद्र आंबेकर यांच्या प्रश्नाला राहुल गांधी यांचे उत्तर
X

भारत जोडो यात्रेचा उद्देश आणि पुढील वाटचाल यासंदर्भात माध्यमांशी बोलण्यासाठी राहुल गांधी यांनी अकोला जिल्ह्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांच्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी उत्तर दिले.

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) 66 दिवसांपासून सुरु आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मात्र राहुल गांधी (Rahul gandhi) ज्या विचारधारेला विरोध करतात. त्याच विचारधारेकडे निवडणूकीच्या काळात काँग्रेसचे (Congress) अनेक नेते जात असतात. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर (Ravindra Ambekar) यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला.

यावेळी रवींद्र आंबेकर यांनी विचारले की, तुम्ही ज्या विचारधारेला विरोध करत आहात. नेमकं निवडणूकीच्या काळात काँग्रेसचे अनेक नेते त्या विचारधारेला जाऊन मिळतात. भारत जोडो यात्रेमुळे या ही समस्या सुटेल का? यावर राहुल गांधी (Rahul gandhi) म्हणाले, मला भारत जोडो यात्रेत एक शिवसेना (Shivsena) आमदार भेटले. ते म्हणाले, त्यांना 50 कोटी रुपये ऑफर करण्यात आले होते. मात्र त्यांनी ते घेतले नाहीत. बाकी अनेकजण गेले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सफाईचे काम सुरू आहे. जे भ्रष्टाचारी लोक आहेत. जे 10, 15 किंवा 50 कोटी रुपयांसाठी विकले जात आहेत. ते भाजपकडे जात आहेत. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. देशात स्वच्छ लोकांची कोणत्याच प्रकारची कमी नाही. त्यामुळे जे स्वच्छ चारित्र्याचे लोक आहेत. ते आमच्याकडे येतील, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.


Updated : 18 Nov 2022 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top