Home > Politics > काळे कारनामे झाकण्यासाठीच काळ्या जादूचा आरोप, राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना उत्तर

काळे कारनामे झाकण्यासाठीच काळ्या जादूचा आरोप, राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना उत्तर

काळे कारनामे झाकण्यासाठीच काळ्या जादूचा आरोप, राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना उत्तर
X

वाढत्या महागाईविरोधात काळे कपडे घालून काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आंदोलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळी जादू असं म्हटलं होतं. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

5 ऑगस्ट रोजी वाढत्या महागाईमुळे काळे कपडे घालून काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यावर टीका करताना अमित शहा यांनी अयोध्या येथे राम मंदिर शिलान्यासाला दोन वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर निषेध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केल्याचा आरोप केला होता. तर काँग्रेस निराशेत असल्याने काळी जादू करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे.



राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांना महागाई दिसत नाही? बेरोजगारी दिसत नाही का? आपले काळे कारनामे झाकण्यासाठीच काळ्या जादूसारख्या अंधश्रध्देच्या गोष्टी सांगून मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खालावत आहेत. तसंच देशाला भटकवणं बंद करा. पंतप्रधान जी जनतेच्या प्रश्नावर उत्तर तर द्यावंच लागेल, असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले की, निराशा आणि हताश झाल्यानेच काही लोक सतत खोटे आरोप करण्यात गुंतले आहेत. मात्र या लोकांवरचा जनतेचा विश्वास उठला आहे. त्यामुळेच ते काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मात्र राहुल गांधी यांनी मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.



Updated : 6 Sep 2022 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top