Home > Politics > "राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करीदेखील करतात," भाजप नेत्याची जीभ घसरली

"राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करीदेखील करतात," भाजप नेत्याची जीभ घसरली

राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करीदेखील करतात, भाजप नेत्याची जीभ घसरली
X

कर्नाटक भाजप अध्यक्ष नलीन कुमार कतील यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. "राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्ज तस्करदेखील आहेत. हे मीडियात आलं होतं. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही." नलीन कुमार यांच्या या वक्तव्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान कर्नाटक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी अशिक्षित असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान कॉंग्रेसच्या या ट्विटनंतर मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, त्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे हे खेदजनक ट्विट पक्षाच्या सोशल मीडिया टीमने केले होते. "राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे यावर माझा विश्वास आहे". त्यामुळं हे ट्वीट काढण्यात येत असल्याचं कॉंग्रेसने म्हटलं होतं.

मात्र, नलीन कुमार यांच्या या वक्तव्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी नलीन कुमार यांनी राहुल गांधी यांची माफी मागावी. अशी विनंती केली आहे.

Updated : 19 Oct 2021 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top