Home > Politics > एकनाथ खडसे यांची 9 तास ED कडून चौकशी

एकनाथ खडसे यांची 9 तास ED कडून चौकशी

एकनाथ खडसे यांची 9 तास ED कडून चौकशी, चौकशी नंतर खडसे यांच्या वकीलाची प्रतिक्रिया Pune land deal: Eknath Khadse ED interrogates Eknath Khadse for 9 hours

एकनाथ खडसे यांची 9 तास ED कडून चौकशी
X

भोसरी MIDC भूखंड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयात (ED) सकाळी 11 वाजता दाखल झालेले एकनाथ खडसे अखेर 9 तासाने बाहेर पडले आहेत. आज सकाळी 11 वाजता ते ED कार्यालयात दाखल झाले होते तेव्हा पासून त्यांची चौकशी सुरु होती.

ED च्या चौकशीतून बाहेर पडलेल्या खडसे यांच्या वकीलाने माध्यमांशी संवाद साधला.

ईडी च्या चौकशीला आमचं सहकार्य असेल. आज ईडीकडे कागदपत्रं सुपूर्द केले, राहिलेले सर्व कागपत्र येत्या १० दिवसात आणखी काही कागदपत्रं इडीला सोपवणार. तसंच गरज असेल तेव्हा खडसे हजर राहतील. असं मत खडसे यांचे वकील मोहन टेकावडे व्यक्त केलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची 12 तास चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीने अटक केली दोन दिवसांपुर्वी अटक केली आहे. त्यानंतर खडसे यांना समन्स पाठवून कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं, खडसे यांनाही अटक होईल अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आज चौकशी नंतर खडसे बाहेर आले. ED notice to Eknath Khadse,

खडसे यांच्या याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना आज सकाळी खडसे यांनी चौकशीला जाण्यापुर्वी माध्यमांशी बोलतांना सांगिलत की, आपण ED ला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. Eknath Khadse on ED तसंच तपास यंत्रणेमार्फत आपल्या कुटुंबियांचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. दरम्यान खडसे नंतर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांचीही चौकशी ED करणार असल्याचे सुत्रांकडून समजतंय.

Eknath Khadse on ED, ED notice to Eknath Khadse, ED arrest Eknath Khadse son-in-law, Girish Chaudhri, Pune land deal

Updated : 8 July 2021 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top