Home > Politics > लाथा-बुक्या आणि राडा, AAP vs BJP अक्षरशः एकमेकांना भिडले...

लाथा-बुक्या आणि राडा, AAP vs BJP अक्षरशः एकमेकांना भिडले...

लाथा-बुक्या आणि राडा, AAP vs BJP अक्षरशः एकमेकांना भिडले...
X

दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) स्थायी समितीच्या निवडणुकीत शुक्रवारी पुन्हा एकदा आम आदमी पक्ष आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. प्रत्यक्षात मतमोजणीवेळी महापौरांनी एक मत अवैध ठरवले होते. यानंतर महापौरांनी फेरमतमोजणीचे आदेश दिले. या आदेशानंतर गदारोळ सुरू झाला. नगरसेवकांमध्ये जोरदार लाथा-बुक्क्या झाल्याचे पाहायला मिळाले. या भांडणात अनेक नगरसेवक जखमी सुद्धा झाले.

स्थायी समितीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य विजयी झाले. या निवडून आलेल्या सदस्यांच्या यादीवर सह्या करण्यास महापौर शैली ओबेरॉय यांनी नकार दिला. एक मत अवैध ठरवून फेरमोजणी करण्याचे आदेश दिले. महामंडळ सचिवांनी फेरमोजणी निर्णयावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यावरून महापौर आणि मनपा सचिव यांच्यात जोरदार वादावादी झाली.

दोघांमध्ये बाचाबाची झाली असता, भाजप नगरसेवकांनी अवैध मत वैध ठरविण्याची मागणी केली असता, महापौरांनी अवैध मत वैध ठरवता येणार नसल्याचे सांगितले. त्यावर भाजप नगरसेवकांनी टेबलावर चढून घोषणाबाजी सुरू केली. 'आप'चे नगरसेवक त्यांना रोखण्यासाठी पुढे गेले असता दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. गदारोळानंतर महापौर शैली ओबेरॉय यांनी आता 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार असल्याचं सांगितले आहे..

येथे, भाजप नगरसेवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी आपच्या नगरसेवकांनी दिल्लीच्या कमला मार्केट पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केले. भाजप नगरसेवकांनी आम आदमी पक्षाच्या महिला नगरसेवकाला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

Updated : 25 Feb 2023 3:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top